Friday, July 25, 2014

रुठ न जाना तूम से कहूॅं तो....

काही गाण्यांबद्दल कमीत कमी बोलणं आणि जास्तीत जास्त त्याचा आनंद घेणं, हेच केव्हाही अत्यंत आनंददायी. 1942- ए लव्ह स्टोरी या चित्रपटातील `रुठ न जाना तूमसे कहू तो` हे गाणं याच गटात मोडणारं.  अनिल कपूर विसरा, मनिषा विसरा (कठीण आहे...तरीही विसरा)...गाण्यांमधील शब्द, लय आणि त्यातील भान फक्त एकदा मनावर थेट येऊ देत आणि पाहा...तुम्हाला जाणवेल, काहीतरी अगम्य असं गम्य आहे. कुमार सानूचं हे नितांतसुंदर गाणं... `याद करोगी मै जो न हू...` तो हे शब्द उच्चारताना त्यानं घेतलेला क्षणाचा पॉझ मनाला नकळत स्पर्शतो....

गाण्यात आवडलेलं - शब्दांपासून अर्थांपर्यंत आणि सेटपासून कलाकारापर्यंत सारं काही
शब्दांत भावलेलं..- नीची ऊंची, ऊंची नीची, लहरोमें तूम देखो कैसी आयोगी नही!
नॉस्ट्रॅल्जिक सीन- आठवा आपाआपले जुने दिवस आणि त्यात जपलेले काही क्षण

-----------------

या गाण्यावर आपल्याही मनात काही असेल तर जरूर कळवा..भेटूया, पुढच्या गाण्यासाठी...फक्त दोन दिवसांत. 

No comments:

Post a Comment